महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाली पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात, सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंद - मच्छीमार

सावित्री, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, नागोठाणे अंबा नदीची पातळीही वाढली असून पाली पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पुलावरील वाहतूक बंद केली आहे.

water flowing above the pali bridge road is closed for safety precautions

By

Published : Jul 30, 2019, 12:48 PM IST

Updated : Jul 30, 2019, 1:13 PM IST

रायगड - जिल्ह्यात रात्री पासून पावसाची संततधार सुरू आहे. रोहा, पाली, महाड, पोलादपूर या भागात पावसाचा जोर वाढलेल्यामुळे सावित्री, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, नागोठाणे अंबा नदीची पातळीही वाढली असून पाली पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पुलावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे, खोपोलीकडे जाणारी व वाकणहून येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

पाली पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात, सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंद

आज (30 जुलै) सकाळी जिल्ह्यात 1,337 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली असून, एकूण 83.61 मिमी पाऊस पडला आहे. कर्जत तालुक्यात सर्वाधिक पाऊस (177 मिमी) पडला आहे. यासोबत, अलिबाग (6 मिमी), पेण (120.30 मिमी), मुरुड (15 मिमी), पनवेल (73.40 मिमी), उरण (41.20 मिमी), खालापूर (135 मिमी), माणगाव (82 मिमी), रोहा (77 मिमी), सुधागड (105 मिमी), तळा (54 मिमी), महाड (93 मिमी), पोलादपूर (131 मिमी), म्हसळा (40 मिमी), श्रीवर्धन (37 मिमी) तर माथेरान (151 मिमी) अशी एकूण पावसाची नोंद झाली आहे.

येत्या 24 तासातदेखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच येत्या २४ तासांमध्ये कोणत्याही मच्छीमाराने पाण्यात जाऊ नये, असे आवाहन प्रादेशिक हवामान खात्याने केले आहे.

Last Updated : Jul 30, 2019, 1:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details