महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा सामान्य रुग्णालयातील 'अपघात विभागा'ला प्राथमिक उपचाराची गरज

जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या बाहेरच्या अपघातग्रस्त अथवा इतर रुग्णाच्या प्राथमिक उपचारासाठी अपघात विभाग स्थापन केला आहे. मात्र, गेल्या वर्षभरात तीन वेळा अपघात विभागाची जागा रुग्णालय प्रशासनाने बदललेली आहे

washroom-not-available-in-the-civil-hospital-alibagh-raigad
जिल्हा सामान्य रुग्णालयातील 'अपघात विभागा'ला प्राथमिक उपचाराची गरज

By

Published : Dec 12, 2019, 1:00 PM IST

रायगड-अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालय हे समस्येचे माहेरघर झाले आहे. रुग्णाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असताना आता अपघात विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात विभागात स्वच्छता गृह, हात धुण्याचे भांडे, याची सोय नसून मोबाईल नेटवर्कही मिळत नाही. तर रुग्णांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना झोपण्यासाठी केवळ दोनच खाट उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांचेच आरोग्य धोक्यात आल्याने त्यांनाच प्राथमिक उपचाराची गरज निर्माण झाली आहे. अपघात विभाग हा अत्याधुनिक सेवांपासून वंचित राहिलेला असताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी हे मात्र मुग गिळून गप्प बसलेले आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील 'अपघात विभागा'ला प्राथमिक उपचाराची गरज

हेही वाचा-नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेमध्ये मंजूर! पाहा कोणी काय दिली प्रतिक्रिया..


गेल्या वर्षभरात तीन वेळा अपघात विभागाची जागा बदलली
जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या बाहेरच्या अपघातग्रस्त अथवा इतर रुग्णाच्या प्राथमिक उपचारासाठी अपघात विभाग स्थापन केला आहे. मात्र, गेल्या वर्षभरात तीन वेळा अपघात विभागाची जागा रुग्णालय प्रशासनाने बदललेली आहे. पूर्वीच्या अपघात विभागात अपघातग्रस्त अथवा इतर येणाऱ्या रुग्णांना तपासण्यासाठी सर्व सोयीने युक्त अशी खोली देण्यात आलेली होती. यामध्ये रुग्णांना ठेवण्यासाठी पाच ते सहा खाट, स्वछतागृह, हात धुण्याची सोय करण्यात आलेली होती.

अपघात विभागातील फोनही लागत नाही
महिनाभरापूर्वी पुन्हा अपघात विभाग हा रक्तशुद्धीकरण विभागाच्या जागेत हलविला आहे. अपघात विभागाची जागा ही रक्तशुद्धीकरण विभागला दिली आहे. या जागेत जेमतेम दोन खाट आहेत. अपघातग्रस्त रुग्णाला तपासल्यानंतर डॉक्टरांना हात स्वच्छ धुण्यासाठी कोणतीच सोय केलेली नाही. तर प्राथमिक उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला आणि येथील कर्मचारी, वैदकीय अधिकारी यांच्यासाठी स्वच्छता गृहाची सुविधा केलेली नाही. या अपघात विभागात कोणत्याही मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याने डॉक्टर अथवा कर्मचारी यांना बाहेरून फोन करावा लागत आहे. तर अपघात विभागातील फोनही लागत नसल्याने बाहेरून फोन करणारे रुग्णाचे नातेवाईकही त्रस्त झाले आहेत.

मुतारीचे पाणी टिपकते रुग्णालयात
अपघात विभागातालील वरील मजल्यावर स्वच्छता गृहातील मुतारीचे पाणी टिपकत असल्याने याचा त्रासही रुग्ण तसेच काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांना सहन करावा लागत आहे. अपघात विभागच अस्वच्छतेच्या गर्तेत असल्याने याठिकाणी काम करणाऱ्याचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. येथील कर्मचाऱ्यांनाही अपघात विभागाची ड्युटी नको, असे बोलण्याची वेळ आली आहे. अपघात विभाग हा प्राथमिक उपचार करण्यासाठी निर्माण केलेला असताना या विभागालाच प्राथमिक उपचाराची गरज निर्माण झाली आहे. अपघात विभागाच्या या समस्येकडे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी लक्ष देणे गरजेचे असताना त्यांनीही या विभागला वाऱ्यावर सोडले असल्याचे चित्र आहे. अपघात विभागात स्वच्छतागृह अथवा हात धुण्याची सुविधा नाही आहे. मात्र, डॉक्टररूममध्ये ती सोय आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी दिली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details