रायगड : मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीतील कल्हे गावाशेजारी असलेल्या विसावा रिसॉर्टला आग लागल्याची घटना आज दुपारच्या वेळी घडली. रिसॉर्टमधील आगीच्या ठिकाणी पडलेले सामान तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने काढले. मात्र आगीचा जोर वाढला असून धुराचे लोट परिसरात पसरले होते.
मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीतील विसावा रिसॉर्टला आग - karnala khind
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी काही प्रमाणात रिसॉर्टचे नुकसान झाले आहे. विसावा रिसॉर्ट हे पूर्वीचे जुने पॅनोरामिक रिसॉर्ट म्हणून ओळखले जात होते.
कर्नाळा खिंडीतील विसावा रिसॉर्टला आग
पेण नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळावर पोहोचून आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी काही प्रमाणात रिसॉर्टचे नुकसान झाले आहे. विसावा रिसॉर्ट हे पूर्वीचे जुने पॅनोरामिक रिसॉर्ट म्हणून ओळखले जात होते.
Last Updated : Mar 29, 2020, 7:35 PM IST