रायगड - खालापूर तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील गारमाळ या गावात गेली कित्येक वर्षे विकासकामे रखडली आहेत. येथे हवा तसा विकास झाला नसल्याने ग्रामस्थांनी आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खालापूर नायब तहसीलदार कल्याणी कदम यांना मतदानावर बहिष्कार टाकण्यात येत असल्याबाबतचे निवेदनही देण्यात आले आहे.
गारमाळ गावच्या ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार खालापूर तालुक्यात असणाऱ्या दुर्गम डोंगराळ भागातील नंदनपाडा ग्रामपंचायत हद्दीतील गारमाळ गावात गेली कित्येक वर्षे त्याठिकाणी आदिवासी व धनगर समाजाची लोकवस्ती असून जसा हवा तसा विकास झाला नसल्याने ग्रामस्थांनी आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. खालापूर नायब तहसीलदार कल्याणी कदम यांना मतदानावर बहिष्कार टाकण्यात येत असलेबाबत निवेदन देण्यात आले.
हेही वाचा - रायगडमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरेंची राष्ट्रवादीत घरवापसी
खालापुर तालुक्यातील नंदनपाडा ग्रामपंचायत हद्दीतील गारमाळ हे गाव डोंगराळ भागात असल्याने येथे चांगल्या दर्जाचा रस्ता नाही, पाण्याची व्यवस्था नाही गेली. गेली कित्येक वर्षे गारमाळ गाव हे विकासापासून वंचित आहे. गावाचा विकास करण्याबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे त्रस्त गावकऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत प्रशासनाला याबाबत निवेदन दिले. तसेच याबाबत खालापुर नायब तहसीलदार कल्याणी कदम यांनी गावकऱ्यांचे निवेदन स्वीकारत सर्वांनी मतदान करण्याचे आव्हान केले. मात्र, जोपर्यंत गावाचा खऱ्या अर्थाने विकास होत नाही तसेच सर्व जीवनावश्यक सुविधा मिळत नाहीत. तोपर्यंत मतदान न करण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम असल्याने ते मतदान करणार नसल्याचे तहसीलदार कदम यांनी सांगितले.
हेही वाचा - रायगड जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून महिला उमेदवारांना पसंती