रायगड - निसर्ग चक्रीवादळाने अनेकांच्या घरांचे नुकसान झाल्याचे आता समोर येत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील मेंटकर्णी गावात हातावर पोट असणाऱ्या शेकडो कुटुंबांना वादळाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे मेंटकर्णी ग्रामस्थांवर बेघर होण्याची वेळ आलीय.
'निसर्गा'चा फटका...श्रीवर्धनमधील कुटुंबांनी थाटला एसटी स्टॅन्डवर संसार! घरांचे छप्परच उडून गेल्याने निवाऱ्याची पर्यायी व्यवस्था करण्याची वेळी कुटुंबीयांवर ओढावली आहे. या गावातील अनेक कुटुंब सध्या एसटी स्टॅन्डवर आसरा घेत आहेत. स्टॅन्डवरच त्यांनी संसार थाटलाय. एसटी स्टॅन्डवरच चूल मांडून गावकऱ्यांनी कुटुंबाचा गाडा ओढायला सुरुवात केलीय.
'निसर्गा'चा फटका...श्रीवर्धनमधील कुटुंबांनी थाटला एसटी स्टॅन्डवर संसार! 'निसर्गा'चा फटका...श्रीवर्धनमधील कुटुंबांनी थाटला एसटी स्टॅन्डवर संसार! मेंटकर्णी ग्रामस्थांवर आलेल्या या संकटकाळात शासनाचा एकही अधिकारी त्यांची विचारपूस करण्यात आला नसल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. हातावर पोट असलेले हे गावकरी मोलमजुरी करतात. यातील काहीजण बांगड्या, भांडी विकण्याचा व्यवसाय करणारे आहेत. या व्यवसायासाठी बँकेकडून घेतलेले 'मुद्रा लोन' कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांना सतावतोय.
'निसर्गा'चा फटका...श्रीवर्धनमधील कुटुंबांनी थाटला एसटी स्टॅन्डवर संसार! 'निसर्गा'चा फटका...श्रीवर्धनमधील कुटुंबांनी थाटला एसटी स्टॅन्डवर संसार! डोक्यावरील छत गेल्याने आता कुटुंबच उघड्यावर आले आहे. त्यामुळे दुष्काळात तेराव्या महिन्याला सामोरे जावे लागत आहे.