महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उरणमध्ये ऑक्सिजन आहे पण बेड नाही

उरण तालुक्यात रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजन सेवा आहे, परंतु ऑक्सिजन आयसीयू बेडची सोय नाही. यामुळे रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई अथवा पनवेलला न्यावे लागत आहे.

उरणमध्ये ऑक्सिजन आहे पण बेड नाही
उरणमध्ये ऑक्सिजन आहे पण बेड नाही

By

Published : May 9, 2021, 1:57 PM IST

रायगड- उरण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजन सेवा आहे, परंतु ऑक्सिजन आयसीयू बेडची सोय नाही. यामुळे रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकमंत्री आदीती तटकरे यांच्याकडे उरणकरांच्या सेवेसाठी आयसीयू बेड लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी, उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केली आहे.

रुग्णांना पुढील उपचारासाठी न्यावे लागते मुंबई, नवी मुंबई अथवा पनवेलला

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पालकमंत्री आदीती तटकरे यांनी उरणमध्ये कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना वेळीच उपचार मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे. परंतु ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेवल कमी होते, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई अथवा पनवेलला न्यावे लागत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयसीयू बेड मिळणे कठीण झाले आहे. आयसीयू बेडच्या धावपळीत रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिडको सेंटरच्या बाजूलाच असलेल्या केअर पॉईंट या हॉस्पिटलमध्ये ही यंत्रणा असून त्याठिकाणी आयसीयू बेडची व्यवस्था केली, तर उरणकरांचे कोरोनाने जाणारे जीव वाचतील. यासाठी केअर पॉइंटचे डॉ. तनेजा यांना आर्थिक साहाय्य मिळाले, तर ते स्वतः व त्यांचे सहकारी ही सेवा देण्यास तयार असल्याचे समजते.

राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यानाही साकडे

पालकमंत्री आदीती तटकरे यांनी याचा सारासार विचार करून उरणकरांचे लाखमोलाचे जीव वाचविण्यासाठी उरणमध्ये लवकरात लवकर आयसीयू बेडची सोय उपलब्ध करावी, अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांनी केली आहे. याच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना पाठविल्या आहेत. आयसीयू बेड सुरू करण्याबाबत पालकमंत्री आदीती तटकरे यांची सकारात्मक भूमिका असल्याचे समजते.

हेही वाचा -'मनोरा पुनर्बांधणीचा निर्णय फडणवीस सरकारचाच, माहिती न घेता भाजपची भ्रष्टाचाराची बोंब'

ABOUT THE AUTHOR

...view details