महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 11, 2022, 5:20 PM IST

ETV Bharat / state

Blast At Uran GTPS Project : उरणमधील जीटीपीएस प्रकल्पात झालेल्या स्फोटामधील तीनही जखमींचा मृत्यू

उरण तालुक्यातील महाजेनकोच्या वायू विद्युत निर्मिती (जीटीपीएस) प्रकल्पामध्ये बॉयलर संचामध्ये झालेल्या स्फोटामुळे (Uran GTPS Project Boiler Explosion) एक ज्युनिअर इंजिनिअर, एक कर्मचारी आणि एक कंत्राटी कर्मचारी हे जखमी झाले होते. या तिघांवर उपचार सुरू असताना , तिघांचाही मृत्यू (Uran GTPS Employee Death in Blast) झाला आहे. तर मयताच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या गेटवर मृतदेह ठेवून आंदोलन केले. (Uran GTPS unit Employee Protest)

Blast At Uran GTPS Project
Blast At Uran GTPS Project

रायगड : उरण तालुक्यातील महाजेनकोच्या वायू विद्युत निर्मिती (जीटीपीएस) प्रकल्पामध्ये बॉयलर संचामध्ये झालेल्या स्फोटामुळे (Uran GTPS Project Boiler Explosion) एक ज्युनिअर इंजिनिअर, एक कर्मचारी आणि एक कंत्राटी कर्मचारी हे जखमी झाले होते. या तिघांवर उपचार सुरू असताना , तिघांचाही मृत्यू (Uran GTPS Employee Death in Blast) झाला आहे. तर मयताच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या गेटवर मृतदेह ठेवून आंदोलन केले. (Uran GTPS unit Employee Protest)

उरणमधील जीटीपीएस प्रकल्पाबाहेर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मृतदेह प्रकल्पाच्या गेटवर आणून केले आंदोलन-रविवारी दुपारच्या वेळेस उरण तालुक्यातील वायू विद्युत निर्मिती केंद्रामध्ये बॉयलरला जोडलेल्या बीसीसी पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, वाफेचा दबाव निर्माण होऊन, बॉयलरमध्ये मोठा स्फोट झाला होता. यावेळी तेथे कार्यरत असलेले ज्युनिअर इंजिनिअर विवेक धुमाळ, टेक्निशियन कुंदन पाटील आणि कंत्राटी कामगार विष्णू पाटील हे गंभीर स्वरूपात भाजले होते. यावेळी ज्युनिअर इंजिनिअर यांचा काही वेळातच मृत्यू झाला होता. तर विष्णू पाटील यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विष्णू पाटील हे कंत्राटी कामगार असल्याने त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पश्चात मोबदला मिळावा यासाठी ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या गेटसमोट विष्णू पाटील यांचा मृतदेह आणून आंदोलन केले. यावेळी 10 लाख रुपये मदत, वारसाला नोकरी देण्याचे प्रकल्पाकडून माजी आमदार मनोहरशेठ भोईर, कामगार नेते भूषण पाटील यांनी मान्य करून घेतले. यानंतर आज तिसरा जखमी रुग्ण कुंदन पाटील यानेही उपचाराअंती अखेरचा श्वास घेतला आहे. यामुळे या रविवारी झालेल्या दुर्घटनेने तीन बळी घेतले असून, मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मोबादलक मिळावा अशी मागणी आता जोर धरत आहे.

सेफ्टीबाबत ट्रेनिंग दिले नाही -प्रकल्पातील घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली असता, सुरक्षेबाबत कोणतेही काळजी घेत नसल्याचे समोर आले आहे. तर सुरक्षेबाबत विचारांक केली असता सुप्रीटेंडेंट इंजिनिअर एस.एल.वाघ यांनी सेफ्टी प्रिकॉशन घेतल्या नव्हत्या हे मान्य करत जरी सेफ्टी प्रिकॉशन घेतले असते तरी हा प्रकार घडणारच होता अशी संतप्त प्रतिक्रिया माध्यमांना दिली. तर सेफ्टी ऑफिसर बाबत विचारणा केली असता वाघ यांनी सेफ्टी ऑफिसर आहे पण सेफ्टीबाबत ट्रेनिंग झाले नसल्याचे म्हटले आहे. यामुळे घडलेल्या अपघातामधील तीन मृत्यू हे हलगर्जीपणाचे बळी गेले आहेत असे म्हटले जात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details