महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिसरी लाट : अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत लहान मुलांचे कक्ष, 'इतके' बेड उपलब्ध - Children Room CFTI Institute

कोरोनाची दुसरी लाट ही काही प्रमाणात जिल्ह्यात आटोक्यात आली आहे. दुसऱ्या लाटेचा धोका कमी होत असताना तिसरी कोरोनाची लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. या लाटेत मुलांना लागण झाल्यास त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात सीएफटीआय या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी अद्ययावत आयसीयू युनिट तयार करून दिले आहे.

pediatric ward Alibag District Hospital
बेड संख्या लहान मुलांचे कक्ष अलिबाग

By

Published : Jun 20, 2021, 3:26 PM IST

रायगड - कोरोनाची दुसरी लाट ही काही प्रमाणात जिल्ह्यात आटोक्यात आली आहे. दुसऱ्या लाटेचा धोका कमी होत असताना तिसरी कोरोनाची लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. या लाटेत मुलांना लागण झाल्यास त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात सीएफटीआय या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी अद्ययावत आयसीयू युनिट तयार करून दिले आहे. यात एक कोटी रुपयांचे अत्याधुनिक यंत्र सामुग्रियुक्त 15 बेड उपलब्ध आहेत.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी आणि सीएफटीआयच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील

हेही वाचा -पेणमधील शेततळे धारकांना मिळणार सोळा लाखांची नुकसानभरपाई

जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या लहान मुलांच्या अद्ययावत कक्षाचे उद्घाटन उद्योजक नृपाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख सीएफटीआयच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई, सभापती दिलीप भोईर, मेट्रेन मोरे, आरडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, नगरसेवक अनिल चोपडा डॉक्टर, परिचारिका आदी यावेळी उपस्थित होते.

अद्ययावत आयसीयू युनिट

जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटरमध्ये अद्ययावत असे लहान मुलांचे आयसीयू कक्ष तयार करण्यात आलेले आहे. या कक्षात 15 बेड, 8 बायकेप, 17 इंफुजन पंप, 15 मॉनिटर, 3 व्हेंटिलेटर, 4 सक्शन मशीन, 1 एचएफटी, 1 शॉक मशीन, 1 मोबाईल एक्सरे, 4 ईसीजी मशीन उपलब्ध करून दिले आहेत. कक्षात कॅमेराही लावण्यात आला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी

कोरोनाची पहिली लाट ही वृद्धांना, दुसरी लाट तरुणांना, तर तिसरी लाट ही लहान मुलांना धोकादायक असणार आहे, असे बोलले जात आहे. त्या अनुषंगाने शासनामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. लहान मुलांना अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. लहान मुलांची प्रतिकार शक्ती ही उत्तम असल्याने त्यांना धोका कमी प्रमाणात होईल, असेही बोलले जात आहे. मात्र, लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी मुलांचा अद्ययावत कोविड कक्ष जिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आला आहे. तसेच, बालरोग तज्ज्ञ, परिचारिका यांनाही या कक्षात तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे, लहान मुलांवर योग्य पद्धतीने या ठिकाणी उपचार होणार आहेत.

बायकेप आणि मोबाईल एक्सरेची कक्षात सुविधा

राज्यात काही रुग्णालयात बायकेप सुविधा नसल्याबाबत बोलले जाते. बायकेपद्वारे रुग्णाला नैसर्गिक ऑक्सिजन पुरविला जातो. ही सुविधा जिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या आयसीयूमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर, लहान मुलांसाठी मोबाईल एक्सरे मशीनही उपलब्ध करून देण्यात आली असून ती कक्षात ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे, रुग्णाला एक्सरे काढण्यासाठी बाहेर न जाता कक्षातच सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा -अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव बनले कोरोनाचा हॉटस्पॉट, गावात पावनेदोनशे जणांना कोरोनाची लागण

ABOUT THE AUTHOR

...view details