कर्जत- खालापूर तालुक्यात उन्हाळी भात पीक कापणीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. ही कापणीची कामे करण्यात बळिराजा मग्न असतानाच पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे, बळीराजाची चिंता वाढली आहे. कर्जत खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेती लागवडीखाली येत असल्याने, उन्हाळी पाटाच्या पाण्यावर डिसेंबर ते मे महिन्याअखेरीस उन्हाळी शेती केली जाते. यासाठी शेतकरी वर्गाला अतिशय कठोर मेहनत घ्यावी लागते. यावर्षीही भात पीक चांगले आले असून भात कापणीला सुरुवात करण्यात आली आहे.
अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान
खालापूर तालुक्यात उन्हाळी भात पीक कापणीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे, बळीराजाची चिंता वाढली आहे.
हातातोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता
गेल्या वर्षी कर्जत-खालापूर तालुक्यात भाताचे पीक उत्तम प्रकारे आले होते. परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या वर्षीही भात पीक चांगले आले असुन ते कापणी, बांधणी आणि झोडणीसाठी जोरदार सुरुवात झाली आहे. परंतु अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अजून दहा ते पंधरा दिवस पाऊस लांबला तरच सर्व पीक कापून, बांधून, झोडून पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. 14 मे ते 16 मेपर्यंत कोकण चक्रीवादळाचा अंदाज दिल्याने खालापूर-कर्जत तालुक्यात 15 मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा -काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन