रायगड: उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायत निवडणुक होत आहे. त्यातील घारापुरी ग्रामपंचायतमधील Gram Panchayat Elections७ जागा व सरपंच पद असे एकूण ८ जागांसाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याने घारापुरी ग्रामपंचायत बिनविरोध Gram Panchayat Elections झाली आहे. माजी सरपंच बळीराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी भाजपचे असतानाही घारापुरी ग्रामपंचायतमध्ये भाजपाला एकही उमेदवार मिळू शकला नाही.
राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे सेनेला शुभसंकेत: उरणमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेने घारापुरी ग्रामपंचायत बिनविरोध करून विजयी खाते उघडल्याने शिवसेनेसाठी पायगुण चांगला असून हा मेसेज राज्यात जाईल, असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा अभिनंदन करताना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी प्रतिपादन केले. तसेच माजी सरपंच बळीराम ठाकूर व त्यांच्या टीमने केलेल्या विकास कामामुळेच विरोधकांना उमेदवार सापडले नाहीत. त्यामुळे घारापुरी हे जागतिक कीर्तीचे बेट असल्याने हा विजय शिवसेनेला तालुक्यात नव्हे, तर राज्यात उभारी देणारे ठरेल असा विश्वास शिवसैनिक दाखवत आहेत.