रायगड -भरधाव दुचाकीवर निघालेल्या दोन तरुणांनी ओव्हर टेक करण्याच्या नादात समोरील जेसीबीला धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात अलिबाग तालुक्यातील तिनविरा धरणाजवळ सोमवारी (आज) दुपारच्या सुमारास घडला. मृतांची नावे अद्यापही कळली नसून पोयनाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
जेसीबीला धडक
भरधाव दुचाकीची जेसीबीला धडक; दोन जण जागीच ठार - अलिबाग दुचाकी अपघात
अलिबाग येथून दोन तरुण नागोठणे येथे कंपनीत कामावर जाण्यासाठी आपल्या दुचाकीने भरधाव वेगाने जात होते. वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याच मार्गाने येत असलेल्या जेसीबीवर दुचाकी धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोनजण जागीच ठार झाले.
![भरधाव दुचाकीची जेसीबीला धडक; दोन जण जागीच ठार दुचाकीस्वार अपघात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12215783-thumbnail-3x2-accident.jpg)
अलिबाग येथून दोन तरुण नागोठणे येथे कंपनीत कामावर जाण्यासाठी आपल्या दुचाकीने भरधाव वेगाने जात होते. तीनवीरा येथे समोरून एक दुचाकीस्वार आला. पुढे जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याच मार्गाने येत असलेल्या जेसीबीवर धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले आहेत. मृत दोघेही परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याने हा मार्ग ठप्प झाला होता.
हेही वाचा -कोरोनासाठीची कामे लावू नका म्हणत शिक्षिकेच्या पतीने केली मुख्याध्यापकास मारहाण