महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन आठवडे उलटले तरी तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक नाही; पनवेल येथील प्रकार

पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात आठ बियरच्या बाटल्या फोडून जीवघेणा हल्ला केल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. मात्र, अद्याप नगरसेवकाच्या मुलांना कळंबोली पोलिसांनी अटक केलेली नाही.

पिडीत तरूणाचा भाऊ

By

Published : Aug 17, 2019, 7:50 PM IST

रायगड -पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात आठ बियरच्या बाटल्या फोडून जीवघेणा हल्ला केल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. यात पीडित तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.

या प्रकरणात सुरुवातीला कळंबोली पोलिसांनी कलम 307 न लावता केवळ हाणामारीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांना झुकते माप मिळाले होते. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने बातमी लावून पीडित तरुणाच्या कुटुंबीयांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कळंबोली पोलीस खडबडून जागे झाले आणि तरुणावर हल्ला करणाऱ्या मुलांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेला दोन आठवडे उलटले तरीही नगरसेवकाच्या मुलांना कळंबोली पोलिसांनी अटक केलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details