रायगड- मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रात पोहण्यास गेलेले 2 जण बुडल्याची घटना सायंकाळी घडली. सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तीन पर्यटक काशीद समुद्र किनाऱ्यावर आले होते. यावेळी ते पोहण्यासाठी समुद्रामध्ये उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले. अभिषेक म्हात्रे (32, रा. पनवेल), पूजा शेट्टी (वय- 28 रा. कोपर खैरणे) असे बुडालेल्या दोघांची नावे आहेत.
रायगडमध्ये काशीद बीचवर पोहण्यास गेलेल्या दोन पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू - रायगड
मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रात पोहण्यास गेलेले 2 जण बुडल्याची घटना सायंकाळी घडली.
पूजा शेट्टी, रोहिणी कटारे या दोघी 23 जून रोजी सकाळी 11 वाजता आपले नातेवाईक अभिषेक म्हात्रे याच्यासोबत मुरुड येथील फार्म हाऊसवर फिरण्यास आले होते. यावेळी संध्याकाळी पोहण्यासाठी अभिषेक म्हात्रे आणि पूजा शेट्टी समुद्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने अभिषेक व पुजा हे बुडू लागले. हे पाहताच किनाऱ्यावर असणाऱ्या रोहिणीने आरडाओरड केली. त्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन अभिषेक व पूजाला समुद्रातून बाहेर काढले.
त्यानंतर अभिषेक व पूजाला उपचारासाठी बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी दोघांना तपासले असता दोघांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मुरुड पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.