रायगड : कोविड 19 च्या आलेल्या संकटामुळे सर्व सामान्य नागरिक तसेच मजूर, कामगार लोकांचे हाल झाले आहेत. अशा कामगार, मजूर लोकांसाठी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि त्याच्या सेवाभावी संस्थांनी, कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. थळ येथे रोज पंधराशे ते दोन हजार लोकांना दोन वेळेचे जेवण दिले जात आहे. आमदाराच्या या मदतीमुळे आज कामगार, मजूर लोक दोन वेळेचे भरपेट जेवत आहेत.
आमदार महेंद्र दळवी रोज करीत आहेत, दोन हजार नागरिकांची जेवणाची व्यवस्था
कामगार, मजूर लोकांसाठी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि त्याच्या सेवाभावी संस्थांनी, कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. थळ येथे रोज पंधराशे ते दोन हजार लोकांना दोन वेळेचे जेवण दिले जात आहे.
कोरोनामुळे सध्या सगळीकडे व्यवहार ठप्प झाले आहेत. कामच बंद असल्याने मजूर, कामगार, हातावर कमवीणारे यांचे अतोनात हाल सुरू झाले होते. अशा लोकांसाठी शासन, प्रशासन, सामाजिक संस्था, मंडळे यांनी पुढाकार घेतला आहे. या लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली जात आहे.
अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या मतदारसंघातील अशा गरजू लोकांसाठी मदतीचा हात दिला आहे. थळ ग्रामपंचायत हद्दीतील आरसीएफ कंपनीसमोर असलेल्या आठवडा बाजारात रोज पंधराशे ते दोन हजार नागरिकांना दोन वेळेचे जेवण वाटण्यात येत आहे. यावेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सोशल डिस्टसिंग ठेवून अन्नाची पाकिटे दिली जात आहेत. तर मतदारसंघात ज्या ठिकाणी गरज आहे त्याठिकाणीही मदत आमदार आणि त्याच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
TAGGED:
Publish In Facebook Page