अलिबाग - बलात्काराच्या गुन्ह्यात अलिबाग कारागृहात अटक असलेल्या दोन कैद्यांनी जेलच्या दगडी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका कैद्याला पकडण्यात यश आले. मात्र, दुसरा कैदी हा फरार झाला आहे. फरार कैद्याला पकडण्यासाठी अलिबाग शहराच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस शोध घेत आहेत. अलिबाग जेलमधून कैदी पळून जाण्याची ही साधारण पाचवी ते सहावी घटना आहे. मात्र, या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
अलिबाग कारागृहातून दोन कैद्यांचे पलायन; एक ताब्यात तर दुसरा फरार - alibag police station
अलिबाग तालुक्यात आणि कोलाडमध्ये घडलेल्या बलात्कार घटनेतील या दोन जणांना अटक करण्यात आली होती. ते अलिबाग शहरातील आंग्रेकालीन जेलमध्ये अटकेत होते. या कारागृहाची भिंत ही दगडी काम केलेली आहे. साधारण 30 ते 40 फूट उंच अशीही भिंत आहे. पोलिसांची नजर चुकवून शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांनी भिंतीवरून खाली उडी मारून पलायन केले.
अलिबाग तालुक्यात आणि कोलाडमध्ये घडलेल्या बलात्कार घटनेतील या दोन जणांना अटक करण्यात आली होती. ते अलिबाग शहरातील आंग्रेकालीन जेलमध्ये अटकेत होते. या कारागृहाची भिंत ही दगडी काम केलेली आहे. साधारण 30 ते 40 फूट उंच अशीही भिंत आहे. पोलिसांची नजर चुकवून शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांनी भिंतीवरून खाली उडी मारून पलायन केले. त्यांच्या या प्रयत्नात मात्र, अलिबाग गुन्ह्यातील अटक झालेल्या आरोपी यास पकडण्यात यश आले आहे. तर कोलाड गुन्ह्यातील आरोपी हा फरार आहे. तीस ते चाळीस फुटावरून उडी मारल्याने दोन्ही कैद्यांना मार बसलेला आहे.
पुढील तपास अलीबाग पोलीस करत आहे. कारागृहातून कैदी फरार झाल्याची वार्ता कळताच अलिबाग पोलिसांनी शहरातील सर्व सीमेवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मात्र, या घटनेने कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.