रायगड - अलिबागमध्ये एकाच दिवशी कोरोनाचे 2 रुग्ण सापडले आहेत. दोघांनाही पनवेलच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अलिबागमध्ये पोलीस कर्मचाऱ्यासह दोन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, उपचार सुरू - अलिबाग कोरोना न्यूज
अलिबागमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांच्या निकट सहवासात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दोन रुग्णांपैकी एकजण मुंबईतून अलिबागेतील तळवडे परहूर येथे आला होता. हा 39 वर्षीय पुरुष मुंबई पोलीस दलात धारावी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तर दुसरा रुग्ण मोरोंडे गावातील असून तो खोपोली येथील तेल कंपनीत कामाला आहे. त्याच्या संपर्कातील कामगार उत्तराखंड येथे पॉझिटीव्ह आढळून आल्याने त्याची तपासणी करण्यात आली.
दोघांचेही अहवाल कोरोना पॉझिटीव्ह येताच त्यांना पनवेल येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले असून ते राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे.