महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमधील अलिबाग व माथेरान येथे २ जण बुडाले

मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक दुर्घटना घडत आहेत.

बुडालेल्या मुलाचा शोध घेताना पोलीस आणि गावकरी

By

Published : Jul 27, 2019, 10:17 PM IST

रायगड -जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून हाहाःकार माजला आहे. अलिबाग आणि माथेरानमध्ये २ जण बुडाल्याची घटना आज सायंकाळी घडली. यश म्हात्रे (१९) व युवराज वालेंद्र हा ६ वर्षीय बालक २ वेगवेगळ्या घटनेत बुडाले आहेत. माथेरानमधील घटनेत युवराज वालेंद्र याचा मृतदेह सापडला आहे, तर यशचा शोध सुरू आहे.

अलिबाग तालुक्यातील चौलमळा, बागमळा परिसरातील खाडी भागात असलेल्या मोरीवर यश म्हात्रे हा आपल्या २ मित्रांसह मासेमारी करण्यासाठी गेला होता. मुसळधार पाऊस पडत असल्याने मोरीवर पाणी वाढले असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने यश व दोघे मित्र बुडू लागले. मात्र, यावेळी यश वाहून गेला आणि २ जण वाचले. स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

माथेरान येथील वाल्मिकी नगर येथे युवराज हा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याच्या आईकडे जात असता नाल्यात पडला. पावसामुळे नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने युवराज वाहून गेला आणि यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details