रायगड- कर्जत तालुक्यातील शेलू गावातील दोघांचा उल्हास नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एक तरुण पोहण्यासाठी नदीमध्ये गेला असता पाण्यामध्ये बुडला व त्याला वाचवताना एका व्यक्तीचा व तरुणाचाही मृत्यू झाला आहे. आयुष तांबे (14) व त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या शंकर काळे (45) या दोघांच्या या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर आयुषचे वडील सूर्यकांत तांबे यांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे.
रायगडमध्ये उल्हास नदीत बुडून दोघांचा मृत्यू - रायगड
कर्जत तालुक्यातील शेलू गावातील दोघांचा उल्हास नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
त्यानंतर आज आयुष व शंकर यांचा मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढले आहेत. शेलू गावातील तरुण आयुष तांबे हा सकाळी आपले वडील सूर्यकांत तांबे याच्याबरोबर उल्हास नदीवर पोहण्यास गेला होता. त्यावेळी आयुष याने नदीत उडी मारली असता तो तळाशी गेला. त्यानंतर तो आलाच नाही. त्यामुळे किनाऱ्यावर असणाऱ्या शंकर काळे यांनी उडी मारून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेही वर आले नाहीत.
त्यावेळी दोघेही बाहेर आले नाहीत म्हणून सूर्यकांत तांबे यांनी नदीत उडी मारली. मात्र तेही बुडू लागले. त्यावेळी काठावर कपडे धुण्यास आलेल्या महिलांनी आपल्याकडील धुण्यास आणलेल्या साड्या पाण्यात टाकून सूर्यकांत याना बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. या घटनेनंतर पोलीस पाटील, ग्रामस्थ, पोलीस यांनी घटनास्थळी येऊन दोघांचे मृतदेह शोधले.