पुराच्या पाण्यातून २ महिन्यांच्या बाळाला वाचवले सुखरुप; पेणमधील अंतोरे गावची घटना - मुसळधार पाऊस
रायगड जिल्ह्यात पेणमध्ये पावसाने उच्चांक गाठल्याने पूर्ण तालुका जलमय झाला आहे. पेणमध्ये रात्री पुराच्या पाण्यात अंतोरे गावातील,दोन महिन्यांच्या बाळासह 30 ते 40 जण अडकले होते. बचाव पथकाने दोन महिन्यांच्या बाळाला व त्याच्या आईला पुराच्या पाण्यातून काढून सुरक्षित स्थळी पोहचवले आहे.

दोन महिन्यांच्या बाळाला सुखरूप स्थळी पोहचवले
रायगड - जिल्ह्यात पेण तालुक्यात 493 मिमी एवढा विक्रमी पाऊस पडला आहे. परिणामी तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पेणमध्ये रात्री पुराच्या पाण्यात अंतोरे गावातील 30 ते 40 जण अडकले होते. यामध्ये एक दोन महिन्यांचे बाळही आपल्या आई-वडिलांसोबत अडकले होते. या कुटुंबासह बाळाला बचाव पथकाने रात्री सुखरुप सुरक्षितस्थळी पोहचवले आहे.
दोन महिन्यांच्या बाळाला सुखरूप स्थळी पोहचवले