रायगड - निसर्ग चक्रीवादळ हे रायगड जिल्ह्याच्या मुरुड समुद्रकिनारी धडकल्याने याचा फटका हा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्याला बसला आहे. या वादळाने खासगी आणि शासकीय मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अनेक भागात झाडे उन्मळून पडून रस्ते बंद पडले आहेत. अनेक इमारतीचे पत्रेही उडाले आहेत. पाऊस थांबल्यानंतर पोलीस प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेले झाडे काढून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले आहेत. चक्रीवादळामुळे मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील मोबाईल नेटवर्क बंद पडले होते, तर वीजप्रवाह पूर्ण बंद करण्यात आला होता. चक्रीवादळ हे रायगडमधून सरकल्याने रायगडकरसह प्रशासनानेही निःश्वास सोडला आहे.
निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम : रायगडमध्ये दोघांचा मृत्यू, वीजपुरवठा खंडीत - रायगड लेटेस्ट न्युज
चक्रीवादळाने अनेक भागात वीज पोल, तारा पडल्या असल्याने जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे वीज सुरू होण्यास पुढील दोन दिवस लागणार आहे. वीज नसल्याने मोबाईल सेवा बंद पडले आहे, तर नेटवर्कही गेले आहे. त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अलिबाग तालुक्यातील उमटे येथील दशरथ वाघमारे (58) महावितरणचा पोल पडून, तर श्रीवर्धन मध्ये भिंत पडून एक असे दोन जणांचा मृत्यू झाला. निसर्ग चक्रीवादळाचा फटका हा रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावरील गावांना बसला आहे. चक्रीवादळामुळे 120 ताशी वेगाने वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडून रस्ते बंद झाले होते, तर शहरातील इमारतीच्या टेरेसवरील पत्रेही वाऱ्याने रस्त्यावर पडले होते. सारे रस्ते हे पालापाचोळा, झाडे, पत्रे यांनी भरून गेले होते. शेतातही पावसामुळे पाणी साचले होते. चक्रीवादळाच्या अनुषंगाने वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. वादळी वारे आणि पाऊस कमी झाल्यानंतर रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला केली असून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले आहेत.