रायगड -माणगाव तालुक्यातील विचवली येथे वीज अंगावर पडून दोन जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये ६ वर्षाची मुलगी बालबाल बचावली आहे. तिच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविंद्र सिताराम दिवेकर, (३०) रा. विचवली माणगाव आणि रिक्षाचालक असलेले मनोहर साबजी देसाई, (६९) हे दोघे वीज अंगावर पडून ठार झाले आहेत.
माणगाव मध्ये वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू, 6 वर्षाची मुलगी बचावली - raigad district rain
माणगाव तालुक्यात मंगळवारी (५ नोव्हेंबर) सायंकाळपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.
माणगाव तालुक्यात मंगळवारी (५ नोव्हेंबर) सायंकाळपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली आहे. रवींद्र दिवेकर हे आपल्या ६ वर्षाच्या मुलीसोबत ऍक्टिव्हावर विचवली येथे आले होते. येथे पावसामुळे ते एका झाडाखाली उभे राहिले. त्यावेळी दिवेकर बाप लेक उभ्या असलेल्या झाडावर वीज कोसळली. दिवेकर यांच्या मुलीच्या कानाला लागून वीज रवींद्र यांच्या अंगावर पडून ते जागीच ठार झाले. तर त्यांची मुलगी जखमी झाली आहे.
मनोहर देसाई हे रिक्षाचालक भाडे सोडून माणगाव कडे येत असताना विचवली पासून १० मीटर अंतरावर आले असता वीज रिक्षावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचे प्राण गेले आहेत.