रायगड- जिल्हा परिषद आणि माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ मे दरम्यान झेडपी कर्मचारी, अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जिल्हा परिषदेच्या कर्मचारी, अधिकारी यांनी उत्तम प्रतिसाद दिला असून २०० जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य शिबिराचा २०० कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ - रायगड
हृदयरोग, डायबिटीस, ताण, युरिन टेस्ट, ईसीजी आणि हिमोग्लोबिन याबाबत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करुन मोफत औषधेही देण्यात आली.
अनेकवेळा कामाच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो. कर्मचारी आणि अधिकारी यांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेने माधवबाग यांच्यामार्फत जिल्हा परिषदमध्ये प्रभाकर पाटील सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन ६ ते ८ मे दरम्यान केले होते. यामध्ये हृदयरोग, डायबिटीस, ताण, युरिन टेस्ट, ईसीजी आणि हिमोग्लोबिन याबाबत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करुन मोफत औषधेही देण्यात आली. रायगड जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी यांच्या नातेवाईक यांनाही या शिबिराचा लाभ घेतला.
माधवबागतर्फे डॉ. अमन कपूर, सचिन कदम तसेच १८ सदस्य यांनी शिबिरात कर्मचाऱ्यांची योग्य तपासणी करुन त्यांच्या आजाराबाबत योग्य उपचार केले. तर, जिल्हा परिषदेनेही कर्मचारी आणि अधिकारी यांच्या आरोग्याबाबत शिबिर घेतल्याबाबत आभार व्यक्त करण्यात आले.