रायगड -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच आता या महामारीने जिल्हाधिकारी कार्यालयात शिरकाव केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची बुधवारी (29 जुलै)ला रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत दोन कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय हे 30 जुलै ते 2 ऑगस्ट असे चार दिवस बंद राहणार आहे. या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय हे पूर्णतः निर्णजतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, 4 दिवस कार्यालय बंद - Raigad corona latest news
जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या अधिकारी कर्मचारी यांची 100 टक्के उपस्थिती असून, शासकीय कामाकरिता जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अभ्यागत जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या अधिकारी कर्मचारी यांची 100 टक्के उपस्थिती असून, शासकीय कामाकरिता जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अभ्यागत जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे इतर अधिकारी कर्मचारी तसेच अभ्यागत यांच्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा एक भाग म्हणून दि.30 व 31 जुलै 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अधिकारी-कर्मचारी तसेच अभ्यागत यांच्याकरिता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. तसेच दि.1 व 2 ऑगस्ट 2020 रोजी शासकीय सुट्टी असल्याने दि.3 ऑगस्ट 2020 पासून जिल्हाधिकारी कार्यालय नियमितपणे सुरू राहील.
या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व दालने, शाखा व परिसरात निर्जंतूकीकरण करण्यात येणार आहे. याआधी जिल्हा परिषद, अलिबाग तहसील कार्यलयात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याने ही कार्यालयेही बंद ठेवण्यात आली होती. आता जिल्हाधिकारी कार्यलयातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे.