रायगड- मुंबई-पुणे द्रुतगति महामार्गावर आज सकाळी खोपोली एक्झिटजवळ दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दोघे जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; २ ठार, चालक गंभीर - road accident at mumbai pune highway
गेल्या चार दिवसात या महामार्गावर खोपोली पोलीस ठण्याच्या हद्दीत घडलेला हा तिसरा मोठा अपघात आहे. या तीन अपघातात एकूण सात जणांनी प्राण गमावले, तर, जवळपास ४५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
आज सकाळी ११ च्या दरम्यान मुंबई-पूणे द्रुतगती महामार्गावर खोपोली एक्झिटजवळ मुंबई लेनवर एका उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत मागे असलेल्या ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीत बसलेल्या क्लिनर व सह प्रवासी या दोघांचा जागीच मृत्यू झाला व ट्रक चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. गेल्या चार दिवसात या महामार्गावर खोपोली पोलीस ठण्याच्या हद्दीत घडलेला हा तिसरा मोठा अपघात आहे. या तीन अपघातात एकूण सात जणांनी प्राण गमावले, तर, जवळपास ४५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.