रायगड -मुरूड तालुक्यातील फणसाड धरणात रोहा तालुक्यातील सारसोली गावच्या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. आज (१८ मे) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ओंकार बिरवाडकर (वय १७) आणि गौरव बिरवाडकर (वय १३) अशी या दोन भावांची नावे आहेत. बुडालेल्या दोघांचेही मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
रायगडमध्ये फणसाड धरणात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू - murud
ओंकार आणि गौरव बिरवाडकर हे दोघेही उन्हाळी सुट्टीनिमित्त मांडला येथे नातेवाईकांकडे आले होते. आज सकाळी हे दोघे भाऊ, नातेवाईक आणि गावातील तरुण फणसाड धरणावर फिरण्यास व पोहण्यास गेले होते.
ओंकार आणि गौरव बिरवाडकर हे दोघेही उन्हाळी सुट्टीनिमित्त मांडला येथे नातेवाईकांकडे आले होते. आज सकाळी हे दोघे भाऊ, नातेवाईक आणि गावातील तरुण फणसाड धरणावर फिरण्यास व पोहण्यास गेले होते. सर्वजण दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास धरणातून पोहून बाहेर पडले. त्याचवेळी गौरव याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्यावेळी मोठा भाऊ ओंकार त्याचा हात पकडून खेचू लागला. मात्र, हे दोघेही पाण्यात पडले.
गौरव व ओंकार पाण्यात बुडू लागताच सोबत असलेल्या तरुणांनी आरडा-ओरड केली. त्यानंतर ग्रामस्थानी घटनास्थळी जाऊन दोघांचा शोध घेतला. त्यानंतर २-३ तासांनी दोघांना बाहेर काढून बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.