रायगड - भंगार गोडाऊन शेजारी उभी असलेल्या बंद होडा सिटी कारमध्ये अडकलेल्या दोन चिमुरड्या सख्ख्या भावांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना महाड तालुक्यातील नांगलवाडी येथे घडली आहे. सुहेल खान (6) आणि अब्बास खान (4) अशी दोघा मृत भावांची नावं आहेत.
बंद कारमध्ये गुदमरून दोन चिमुरड्या सख्ख्या भावांचा मृत्यू - रायगड लेटेस्ट न्यूज
कारची काच फोडून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले असून महाड औद्योगिक वसाहत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
महाड तालुक्यातील नांगलवाडी येथील खान कुटूंबातील सुहेल आणि अब्बास ही भावंडे सायंकाळी घराशेजारी असलेल्या भंगार गोडावून शेजारी खेळत होते. भंगार गोडाऊनमध्ये एक जुनी होंडा सिटी कार उभी होती. त्या कारमध्ये सुहेल आणि अब्बास जाऊन बसले. मात्र कार आतून लॉक झाल्याने दोघांनीही बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र ते शक्य न झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.
पालकांनी आपली मुले कुठे दिसत नाही म्हणून शोध घेतला. मात्र, कुठेही सापडली नसल्याने अखेर महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात जाऊन मुले हरविल्याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध घेतला असता दोघेही भावंडे कारमध्ये मृतावस्थेत आढळली. कारची काच फोडून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले असून महाड औद्योगिक वसाहत पोलीस अधिक तपास करीत आहेत.