खालापूर (रायगड) - श्रावण महिन्याचे आगमन काही तासावर आले आहे. त्यातच मांसाहारीसाठी रविवार येत असल्याने सकाळपासूनच मटणसह मासळी विक्रेत्यांकडे लांबच-लांब रांगा लागल्याचे दृश्य खालापुरात आहे. गावठी कोंबडी तसेच बोकडाचे मांस, मासळी हे घेण्यासाठी जणू अनेक ठिकाणी यात्रेसारखे स्वरुप प्राप्त झाले आहे.
खालापुरात गटारीच्या निमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल, मासळी मटणवर खवय्यांचा ताव - khalapur mutton market news
रावण प्रत्येक जण पाळत असतात. तसेच या वर्षी गटारी अमावस्या रविवारी आल्याने खवय्यांसाठी मोठी पर्वणी निर्माण झाली आहे. यामुळे मिळेल तेथून मटण-मच्छी घेवून पंचपक्कवांनाचा बेत करण्यात आला. आपल्याला आता महिनाभर मांसाहार खाण्यास मिळणार नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी गटारी साजरी करण्यात आली.
मांससह मासळी खरेदी करण्यासाठी खवय्यांची गर्दीच गर्दी
मराठी महिन्यातील श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. विशेष करुन या महिन्यात पालेभाज्यांचे सेवन अनेक जण करत असतात. वर्षभर आपण मांसाहार करत असल्यामुळे एक महिनातरी पाळावे या विचारांतून अनेक जण श्रावण महिना पाळत असतात. शिवाय हा महिना धार्मिक सणांचा असल्याने या महिन्यात अनेक सण येत असतात. या सर्व बाबीचा विचार करुन मांसाहार वर्ज्य करावे आणी शरिरा बरोबर मन पवित्र राहवे. त्याच बरोबर जंगलात निर्माण होणारी विविध रानभाज्या या श्रावण महिन्याच्या निमित्ताने सेवन करावे. कारण यामध्ये विविध जीवनसत्त्व असल्याने आपल्या शरिरामध्ये उर्जा आणि शरिर मजबूत राहण्यास मदत होते.
'गटारी' रविवारੀ आल्यांने खवय्यांसाठी पर्वणी
श्रावण प्रत्येक जण पाळत असतात. तसेच या वर्षी गटारी अमावस्या रविवारी आल्याने खवय्यांसाठी मोठी पर्वणी निर्माण झाली आहे. यामुळे मिळेल तेथून मटण-मच्छी घेवून पंचपक्कवांनाचा बेत करण्यात आला. आपल्याला आता महिनाभर मांसाहार खाण्यास मिळणार नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी गटारी साजरी करण्यात आली.