महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुळशीखिंडीत रस्ता खचला, कशेडी घाटाकडे जाणारा पर्यायी मार्ग बंद - raigad road

या मार्गाचा वापर करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या ३ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली असून दरड, झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहे.

तुळशीखिंडीत रस्ता खचला

By

Published : Sep 6, 2019, 2:00 AM IST

रायगड- तुळशीखिंड रस्त्याला फाळकेवाडी येथे भगदाड पडल्याची घटना समोर आली आहे. रस्ता खचल्याने कशेडी घाटाला पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. नातूनगर विन्हेरेमार्गे महाडकडे जाणारा हा रस्ता आहे. रस्ता वाहून गेल्याने कोकणातून परतणाऱ्या गणेश भक्तांना त्रास सहन करावा लागणार आहे.

तुळशीखिंडीत रस्ता खचला

हेही वाचा - कोट्यवधी रुपये पाण्यात..! नुतनीकरण केलेला मुंब्रा बायपास उखडल्याने प्रवाशांमध्ये रोष

या मार्गाचा वापर करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या ३ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली असून दरड, झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहे.

हेही वाचा - हेल्मेट घातले नाही म्हणून कारचालकाला दंड!

कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून तुळशीखिंड मार्ग हा कोकणात जाण्यासाठी आणि मुंबईकडे येण्यासाठी सोयीस्कर पडतो. मात्र, आता या रस्त्यालाच भगदाड पडल्याने गणेश विसर्जन करून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details