महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेल येथे पत्नीच्या डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न; पती गजाआड - बेड्या

शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेडुंग इथल्या बेर्ले गावात एका आदिवासी पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न तिच्या पतीने केला आहे. मीच पत्नीच्या डोक्यात दगड घातला असल्याची कबुलीही चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या पतीने दिली आहे.

जखमी पिंकी कातकरी

By

Published : Jun 25, 2019, 11:14 PM IST

पनवेल - शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेडुंग इथल्या बेर्ले गावात एका आदिवासी पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न तिच्या पतीने केला आहे. मीच पत्नीच्या डोक्यात दगड घातला असल्याची कबुलीही चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या पतीने दिली आहे.

आदेश कातकरी असे या आरोपी पतीचे नाव आहे. आदेश कातकरी आणि पिंकी कातकरी (वय 24) हे दोघेही पनवेलमधल्या शेडुंग परिसरातील बेर्ले इथल्या कातकरी वाडीमध्ये राहत होते. पत्नी पिंकी हिच्याशी त्याचे वारंवार भांडण होत होते. त्या त्रासाला कंटाळून तिला जीवे ठार मारण्याचा निर्णय त्याने घेतला. पिंकीही नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळेला कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. तिकडे कुणी नसल्याचे पाहुन पती आदेशने नदीवरील मोठा दगड पत्नीच्या डोक्यात घातला. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरुन गेले होते. पीडित पत्नी पिंकी गंभीर जखमी झाली असून कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेचा तपास करण्यासाठी पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय साबळे पोहचले. त्यांनी तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या 24 तासात आरोपी पतीच्या हातात बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीची सुनावली असून तो सध्या पनवेल पोलिसांच्या ताब्यात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details