रायगड -मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटातील मेकॅनिक पॉइंटच्या वरच्या बाजूच्या वळणावर मुंबईच्या दिशेने उतणाऱ्या वाहनावरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बॅरिकेडिंग तोडून वाहन दरीत कोसळले. त्याठिकाणी असलेल्या झाडामुळे वाहन खोल भागात कोसळू शकले नाही. त्यामुळे वाहनचालक आणि त्याच्या साथीदाराचा जीव वाचला.
झाड ठरला देवदूत, वाचले दोघांचे प्राण - truck accident on mumbai pune old highway
चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याचे सुरक्षा कठडे तोडून ट्रक दरीत कोसळला. मात्र तेथे असलेल्या झाडावर हा ट्रक अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. झाडामुळे ट्रकमधील दोन जणांचे जीव वाचले आहे.
आजवर याच झाडाने शेकडो वाचवले प्राण
बोरघाटातून ट्रक नो एंट्रीमार्गे खोपोलीकडे येत असताना तो मेकॅनिक पॉइंटच्या जवळील तीव्र उतारावर आला असताना चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याचे सुरक्षा कठडे तोडून ट्रक दरीत कोसळला. मात्र तेथे असलेल्या झाडावर हा ट्रक अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. झाडामुळे ट्रकमधील दोन जणांचे जीव वाचले आहे. आजवर याच झाडाने शेकडो प्राण वाचवले असून आणि कित्येक अपघातात धीरोदात्तपणे ते उभे होते, मात्र दुर्दैवाने ते आज धारातीर्थी पडले आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट तसेच बोरघाटातील मृत्युंजय देवदूत यांच्या मार्फत त्या झाडाला पुनः उभे करून पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.