रायगड (खालापूर)- मुंबई-पुणे जुन्या महामार्गाने लोणावळाहून खोपोलीकडे ट्रक जात असताना ब्रेकमध्ये बाटली अडकल्याने ट्रकचा ब्रेक लागला नाही. यामुळे झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा जागीतच मृत्यू झाला आहे.
याबबात सविस्तर वृत्त असे की, पुण्याहून मुंबईकडे जाणारा ट्रक नो एंट्रीमार्गे खोपोलीकडे जात असताना तो दस्तूरी येथील अवघड वळणावर अंडा पॉईंट जवळ आला असता ट्रकच्या ब्रेकमध्ये पाण्याची बाटली अडकल्याने ट्रकचा लागला ब्रेक नाही. त्यामुळे ट्रक समोरील कठड्याला जोरदार धडकली. यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.