रायगड - 'मुबंई-पुणे एक्स्प्रेस-वे'वर एक मालवाहतूक ट्रकाला कॉइल घेऊन जात असाताना, अमृतांजन पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, अपघातामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लाबच लांब रांगा लागलेल्या आहेत. दरम्यान, तब्बल तीन तासापासून प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले आहेत.
मुंबई-पुणे महामार्गावर मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात; महामार्गावर वाहतूक कोंडी
मालवाहतूक ट्रकातील कॉइल घसरुन रस्तावर समांतर झाल्याने मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
जे. एस. डब्लू. कंपनीतून मालवाहतूक ट्रक पुण्याकडे तीन कॉइल घेऊन निघाला होता. दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर अमृतांजन पुलाजवळ असलेल्या चढावावर हा ट्रक चढत असतात, मागे ठेवलेल्या कॉइल सरकून महामार्गावर समांतर झाल्या. सुदैवाने या कॉइल कोसळ्यामुळे कोणत्याही वाहनाला ईजा झाली नाही, यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या कॉइल अतिशय गरम असून त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. यानंतर अपघातांनतर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. दरम्यान, कॉइल बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून हळूहळू वाहतूक सुरू झालेली आहे.
हेही वाचा -उद्धव ठाकरे म्हणतात आमचं ठरलंय, पण पाटील म्हणतात अजून ठरायचंय