महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अलिबाग समुद्रकिनारी विराजमान झाला 'ट्राॅफी रणगाडा'; भारत-पाक युद्धात गाजवलाय पराक्रम - Trophy tank T 55

रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि आताचे कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून अलिबाग समुद्रकिनारी रणगाडा तोफ बसविण्यात आली आहे. यासाठी सूर्यवंशी यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता.

Trophy tank T 55 is now on display at Alibagh beach
अलिबाग समुद्रकिनारी विराजमान झाला 'ट्राॅफी रणगाडा'; भारत-पाक युद्धात गाजवलाय पराक्रम

By

Published : Dec 26, 2020, 2:12 AM IST

रायगड : रशियन बनावटीचा भारतीय लष्करात भीम पराक्रम गाजविलेला टी-55 या ट्रॉफी रणगाडा तोफेचे अलिबाग समुद्रकिनारी दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले. आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ट्रॉफी रणगाडा तोफेमुळे अलिबागच्या समुद्रकिनारी सौन्दर्यात भर पडली आहे. युवावर्गाला लष्करात भरती होण्यास प्रोत्साहन ठरणार्‍या या रणगाड्याचे जवळून दर्शन घेण्यासाठी अलिबागकरांसह पर्यटकांनी हजेरी लावली होती.

तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी याची संकल्पन..

रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि आताचे कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून अलिबाग समुद्रकिनारी रणगाडा तोफ बसविण्यात आली आहे. यासाठी सूर्यवंशी यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. केंद्राकडूनही तोफ रणगाडा बसविण्यास परवानगी मिळाली होती. त्यानंतर पुणे येथून टी 55 ट्रॉफी रणगाडा तोफ अलिबागेत दाखल झाली. अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी पुढाकार घेऊन समुद्रकिनारी चौथरा बांधून रणगाडा विराजमान केला.

अलिबाग समुद्रकिनारी विराजमान झाला 'ट्राॅफी रणगाडा'; भारत-पाक युद्धात गाजवलाय पराक्रम

भारत पाक-युद्धात गाजलेली टी 55 रणगाडा तोफ..

25 डिसेंबर रोजी आज सायंकाळी मोठ्या दिमाखात ट्रॉफी रणगाडा तोफेचे लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी कॅप्टन उमेश वाणी यांनी रणगाडा तोफेविषयी माहिती उपस्थितांना सांगितली. ट्रॉफी रणगाडा तोफ ही रशियन बनावटीची असून भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजविला आहे. अलिबाग समुद्रकिनारी रणगाडा तोफ बसविल्यामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. रणगाडा तोफेच्या बरोबर सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. रायगड पोलिस बँड पथकाच्या देशभक्तीपर सुरेल गितवादनाने वातावरण भारुन गेले होते.

हे मान्यवर होते उपस्थित..

तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कल्याण मनपाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, माजी आमदार पंडित पाटील, रायगड पोलिस अधिक्षक अशोक दुधे, टी 55 रणगाडयावर प्रत्यक्षात सेवा बजावलेले निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन उमेश वाणी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रघुजी आंगे्र, लान्स नायक सुधीर पाटील, गजेंद्र दळी, प्रविण ठाकूर, उपनगराध्यक्षा अ‍ॅड मानसी म्हात्रे, नगरसेवीका चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, मुख्याधिकारी महेश चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी कर्मचारी व नागरीक, पर्यटक उपस्थित होते.

हेही वाचा :एकनाथ खडसेंना 'ईडी'ची नोटीस? भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी चौकशीची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details