रायगड - किरकोळ वादातून पतीने पत्नी आणि 2 चिमुरड्यांची दोरीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना माणगाव तालुक्यातील दहिवली गावात घडली आहे. सुहानी संतोष शिंदे (36), पवन शिंदे (5) आणि संचित शिंदे (2), अशी मृतांची नावे आहेत.
रायगडमध्ये तिहेरी हत्याकांड, पतीने पत्नीसह २ लहान मुलांची केली हत्या - dahiwali raigad triple murder
रायगडमध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेसह दोन लहान मुलांचा समावेश आहे.
![रायगडमध्ये तिहेरी हत्याकांड, पतीने पत्नीसह २ लहान मुलांची केली हत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4987832-thumbnail-3x2-nanan.jpg)
संतोष शिंदे, असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याचे कुटुंब मोलमजुरी करते. त्याचे पत्नीसोबत वारंवार खटके उडत होते. रात्रीदेखील दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या रागातून त्याने पत्नी व दोन लहान मुलांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. आरोपी संतोष शिंदेला ताब्यात घेतले. त्यानंतर पंचनामे करण्याचे काम सुरू असून त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.