महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Drinking Water Crisis : आदिवासी वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई, महिलांना मिळेल त्या खड्ड्यातून भरावे लागते पाणी - आदिवासी वाड्यांचा विकास खुंटला

रायगड जिल्ह्यातील पेण परिसरात आदिवासी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ( Tribal People Struggle For Drinking Water ) वणवण करावी लागत आहे. आदिवासी वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची ( Struggle For Drinking Water In Raigad ) कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे आदिवासी ( Tribal People Struggle ) महिलांना मिळेल त्या खड्ड्यातून पिण्याचे पाणी भरुन आणावे लागत असल्याचे विदारक दृश्य रायगड जिल्ह्यात दिसून येत आहे. यासह हा परिसर अतिदुर्गम असल्याने पाड्यावर जाण्यासाठी रस्ते नसल्याने नागरिकांना कसरत करावी लागत आहे.

Drinking Water Crisis Raigad
खड्ड्यातून पिण्याचे पाणी भरताना महिला

By

Published : Dec 27, 2022, 5:43 PM IST

रायगड -सरकारच्या वतीने लाखो-कोटी रुपयाचा निधी खर्चून जलजीवन मिशन योजनेतून हरघर जल योजना राबविली जात आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यावर ( Tribal People Struggle For Drinking Water ) गावकऱ्यांना पाण्यासाठी मिळेल त्या खड्ड्यातून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. पेण तालुक्यांतील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीसह इतर वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई ( Struggle For Drinking Water In Raigad ) निर्माण झाली आहे. आदिवासी महिलांना ( Tribal People Struggle For Drinking Water ) पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. खड्ड्यांमधून पिण्याचे पाणी भरावे लागत असल्याचे विदारक दृश्य सध्या दिसत आहे. त्यामुळे या टंचाईग्रस्त वाडी-गावात पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आदिवासी वाडयांचा खुंटला विकासपेण तालुक्यातील पाच आदिवासी वाडयांचा ( Struggle For Drinking Water In Raigad ) विकास खुंटला असून येथील वाड्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. बोरगाव ही आदर्श ग्राम पंचायत असताना या परिसरात असलेल्या उंबरमाळ आदिवासी वाडीतील ( Tribal People Struggle For Drinking Water ) आदिवासी नागरिकांना आजतागायत रस्ता नाही. शिवाय आदिवासी महिलांना पिण्यासाठीचे शुद्ध तर सोडाच पण पिण्यायोग्य पाणीही उपलब्ध नाही. येथील महिलाना पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर अंतर भटकून गुराढोरांनी पिलेले अथवा जंगली प्राण्यांनी पिलेले पाणी ( Tribal People Struggle ) मिळेल, त्या खड्ड्यातून भरावे लागत आहे.

पाच वाड्यांची एक स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करण्याची मागणीआमची वाडी बोरगाव ग्रापंमध्ये तात्पुरती असल्याचे आम्हाला वारंवार सांगितले जाते. त्यामुळे आम्हाला कोणत्याच सुविधा ( Struggle For Drinking Water In Raigad ) मिळत नाहीत. म्हणून आमच्या विकासासाठी तांबडी, काजूची वाडी, खऊसावाडी, केळीचीवाडी आणि उंबरमाळ या पाच वाड्यांची एक स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करण्यात यावी, अशी मागणी या आदिवासी वाडीतील आदिवासी नागरिक ( Tribal People Struggle ) करत आहेत. आदिवासी ग्रामस्थ सुनिल वाघमारे, निलम वाघ, गीता वाघमारे, यशवंत वाघमारे, किसन पवार, दत्तू हिलम, शिमग्या हिलम, कृष्णा पवार, सतीश पवार, यमुना वाघमारे, कमळी हिलम शोभा हिलम, राजू हिलम संतोष हिलम, गोपीनाथ हिलम यांच्यासह इतर आदिवासी महिला-पुरुषांनी आपल्या अडीअडचणीं बाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांची भेट घेऊन ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्यावतीने पिण्याच्या ( Tribal People Struggle For Drinking Water ) पाण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

अतिशय दुर्गम भाग असल्याने अडचणीउंबरमाळ व इतर आदिवासी वाड्या या मळेघर ग्रामपंचायत हद्दीत येतात. फक्त इतर कामांसाठी बोरगाव ग्रामपंचायतीचा ( Tribal People Struggle For Drinking Water ) संबंध येतो. हा अतिशय दुर्गम भाग आहे. त्यामुळे येथील रस्ते बनविण्यासाठी ( Tribal People Struggle ) मोठ्या निधीची गरज आहे. तसेच कोणतेही काम करण्यासाठी वनखात्याची परवानगी घ्यावी लागते. बोरगाव ग्रामपंचायतीचे उत्पन्न तेवढे नाही, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या रस्त्यांची कामे करता येतील. शासनाने या पाच वाड्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत बनवावी, त्यासाठी लागणारे ठराव व इतर सहकार्य मी करेन, तर उंबरमाळ भागातील पाणी प्रश्न ( Struggle For Drinking Water In Raigad ) सोडवण्यासाठी जलजीवन मिशन योजना मंजूर झाली आहे. लवकरच हे काम पुर्ण करुन उंबरमाळसह इतर आदिवासी वाडीतील जनतेला पाणी पोहोचण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे अशी माहिती बोरगाव ग्रूप ग्राम पंचायतचे सरपंच सुधीर पाटील यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details