रायगड - वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीवर शिवनगरवाडी, शिंदीवाडी, तळेगाववाडी, पानशिलवाडी तसेच श्रमजीवी संघटनांच्या सहकार्याने आदिवासी बांधवांनी मोर्चा काढून विविध मागण्या केल्या.
आदिवासी बांधवांनी वाचला समस्यांचा पाढा
श्रमजीवी संघटनेच्या सहकार्याने वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांनी गुरुवारी (10 जून) मोर्चा काढला. तसेच, वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात मोजक्याच आदिवासी बांधवांना घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी आदिवासी बांधवांनी समस्यांचा पाढाच वाचला. खावटी अनुदान योजना 2020 शासन निर्णंयाची अंमलबजावणी करुन 2 हजार रुपयांच्या जिवनावश्यक वस्तू आदिवासी लाभार्थ्यांना न मिळणे, मंजूर लाभार्थ्यांना बॅंक खात्यावर जमा न झालेले 2 हजार रुपये जमा होण्यास का विलंब? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कमिटीने समाधानकारक उत्तर देवून आदिवासी बांधवांना शिल्लक अनुदान एक महिन्याच्या आत जमा होईल, असे आश्वासन दिले.
'आदिवासी बांधवांना त्यांचा हक्क द्यायलाच पाहिजे'