महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव ट्रेलरने 6 वाहनांना उडवले, पेण तालुक्यातील घटना - trailer hit vehicle pen

मुंबई - गोवा महामार्गावरील पेणनजिक आज चित्र विचित्र अपघात झाला. एका भरधाव ट्रेलरने पहिल्यांदा गोविर्ले येथे एकामागोमाग चार गाड्यांना ठोकून पलायन केले. तर, पुढे जाऊन त्याने खारपाडा येथे आणखी 1 कार व एका मोटारसायकलला उडवल्याची घटना घडली.

trailer hit vehicles Kharpada
ट्रेलरने वाहनांना उडवले

By

Published : Jul 25, 2021, 10:43 PM IST

रायगड -मुंबई - गोवा महामार्गावरील पेणनजिक आज चित्र विचित्र अपघात झाला. एका भरधाव ट्रेलरने पहिल्यांदा गोविर्ले येथे एकामागोमाग चार गाड्यांना ठोकून पलायन केले. तर, पुढे जाऊन त्याने खारपाडा येथे आणखी 1 कार व एका मोटारसायकलला उडवल्याची घटना घडली. यावेळी गोविर्ले येथील स्थानिक तरुणांनी ट्रेलरचा पाठलाग करून त्यास कर्नाळ्यात पकडून दादर सागरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

अपघातग्रस्त वाहन

हेही वाचा -केळवली-डोळवली रेल्वे मार्ग तात्पुरता बंद, रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

ट्रेलर क्रमांक डीडी 01 ए 9777 हा भरधाव असताना त्याने पहिल्यांदा गोविर्ले येथे 4 कारना एकामागोमाग उडवत पलायन केले. तर पुढे जाऊन खारपाडा येथे आणखी 1 कार व 1 मोटारसायकलला जोरदार धडक देऊन पनवेलच्या दिशेने पलायन केले. यावेळी गोविर्ले येथील स्थानिक तरुणांनी पाठलाग करून कर्नाळ्यात ट्रेलर पकडला आणि ट्रेलर चालकाला दादर सागरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघाताने सर्व गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून जखमींना अधिक उपचारांसाठी उप जिल्हा रुग्णालय पेण येथे दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद दादर सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

पाठलाग करणाऱ्या मोटारसायकलस्वारास पण उडवले

भरधाव ट्रेलरचा पाठलाग करणारा बळवली येथील तरुण दुर्वास पाटील यास सदर ट्रेलर चालकाने उडवले असून त्यास जोरदार दुखापत झाली आहे. त्यास अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा -VIDEO : महाड दुर्घटना : सरकार यातून काही बोध घेणार का?

ABOUT THE AUTHOR

...view details