रायगड - कोकणातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. यावर्षी 22 ऑगस्टला गणेशोत्सव सण राज्यात साजरा होत आहे. मात्र, यावेळी गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असल्याने कोकणात येणाऱ्या चाकरमानी यांनी 14 दिवस आधी गावात येऊन होम क्वारंटाईन राहायचे आहे. त्यामुळे चाकरमानी हे आतापासूनच गावी येण्यास सुरुवात झाली आहे. मुबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाहन कोंडी झाली आहे. कशेडी घाटातील चेकपोस्टवर तपासणी करून चाकरमानी याना पुढील प्रवासाला सोडले जात आहे. चाकरमानी हा वीस दिवस आधीच आपल्या गावी पोहोचत आहे.
कशेडी घाटात वाहतूक कोंडी.. 20 दिवस आधीच चाकरमान्यांच्या कोकणाकडे रांगा - रत्नागिरी गणेशोत्सव बातमी
यावर्षी 22 ऑगस्टला गणेशोत्सव सण राज्यात साजरा होत आहे. यासाठी कोकणातील चाकरमानी 20 दिवस आधीच गावात येत आहेत. कारण, चाकरमान्यांना गावात आल्यानंतर कोरोनाचा प्रवादुर्भाव होऊ नये, यासाठी 14 दिवस होम क्वारंटाईन व्हायचे आहे. चाकरमान्यांच्या वाहनांमुळे कशेडी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
कोकणात गणेशोत्सव सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपला लाडका बाप्पा घरी येणार म्हणून चाकरमानी हे आठ दिवस आधीच गावी येत असतात. बाप्पाच्या आगमनाची तयारी हे भाविक घरी आल्यानंतर करीत असतात. त्यामुळे सगळीकडे चैतन्याचे वातावरण गावात पसरलेले असते. मात्र, यावर्षी कोरोनाचा संकट असल्याने गणेशोत्सव साजरा करताना बंधने आली आहेत. मुंबई, उपनगर, ठाणे, पुणे येथून येणाऱ्या चाकरमानी कोकण वासीयांना गणेशोत्सव सणाला यायचे असेल तर सात ऑगस्टपूर्वी येऊन होम क्वारंटाईन राहायचे आहे, असे आदेश शासन व प्रशासनाने काढले आहेत.
गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी 14 दिवस घरात विलगीकरण राहायचे असल्याने चाकरमानी हे आजपासूनच आपल्या गावी येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांच्या वाहनांची वर्दळ पाहायला मिळत आहे. कशेडी घाटात प्रवाशांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. कशेडी घाटात बंगला चेकपोस्टवर चाकरमान्यांच्या कागदपत्रांची तपासणी करूनच पुढील प्रवासास सोडले जात आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना काही काळ ताटकळत बसावे लागत आहे.