रायगड - महाड भोर मार्गावरील वरंध घाटाच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. दोन दिवसात हा घाट वाहतुकीसाठी पुर्णबंद केला जाणार आहे. रविवारी पहाटे वरंध घाटात वाघजाई मंदिराशेजारी भोर हद्दीत दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरडीचा काही भाग बाजूला केल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे.
महाड भोर मार्गावरील वरंध घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा - Traffic was disrupted due to a landslide
महाड भोर मार्गावरील वरंध घाटाच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. दोन दिवसात हा घाट वाहतुकीसाठी पुर्णबंद केला जाणार आहे. रविवारी पहाटे वरंध घाटात वाघजाई मंदिराशेजारी भोर हद्दीत दरड कोसळली.
वरंध घाटात रस्त्याच्या मधोमध दरड..
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा पंढरपूर महाड मार्गावर वरंध घाटात आज दरड कोसळली. त्याुमळे वाहतूक बंद झाली आहे. रस्त्याच्या मधोमध दरड पडल्याने दोन्हीकडे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एकीकडील दरड काढून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
एकेरी वाहतूक सुरू..
रस्त्यावरील बाजुला असलेल्या दगड्याच्या कड्याचा मोठ्ठा भाग खाली आल्याने काहीकाळ वाहन चालकांचा खोळंबा झाला. वाहनचालकांनी रस्त्यावर पडलेल्या दगडी बाजुला करीत एक गाडी जाईल एवढा रस्ता मोकळा केला. दुपारपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाची माणस या ठिकाणी पोहोचली नसुन सद्या एकेरी वाहतुक सुरू आहे. 10 फेब्रुवारीपासून रस्ता दुरुस्ती कामासाठी हा मार्ग 80 दिवसांसाठी बंद राहणार आहे. त्याआधीच दरड कोसळून वाहतूक बंद पडली आहे.
हेही वाचा -शेतकऱ्यांना भेटू न देणे ही केंद्राची भूमिका दुर्दैवी - खासदार सुप्रिया सुळे
TAGGED:
landslide on Mahad Bhor road