रायगड - दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी समुद्र किनारी गर्दी केली असून, सध्या सर्व किनारे पर्यटकांनी फुलले आहेत.
पर्यटकांनी फुलले समुद्रकिनारे; दिवाळीच्या सुट्ट्यामुळे गर्दी - raigad tourist
ऐन दिवाळीत अरबी समुद्रात क्यार चक्रीवादळामुळे अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. परंतु, हे वादळ दक्षिणेकडे सरकल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यामुळे पर्यकांची मोठी गर्दी किनाऱयांवर लोटली आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यामुळे पर्यकांची मोठी गर्दी किनाऱयांवर लोटली आहे.
गणपती व नवरात्र या सणांदरम्यान पाऊस होता. तसेच दिवाळीतही पावसाचे सावट होते. यंदा चक्रीवादळामुळे पर्यटकांनी काही प्रमाणात पाठ फिरवली होती. मात्र, आता चक्रीवादळाचा धोका टळल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत.
दिवाळीत शाळा तसेच कॉलेजला सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर या समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.