रायगड :जिल्ह्यातील उरण तालुक्यात असणाऱ्या जागतीक ख्यातीच्या घारापुरी बंदरावरील ( Gharapuri Port ) व्यावसायिक जनजीवन पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना काळामध्ये दोन वर्षे पर्यटन बंदीमुळे येथील व्यवसाय पूर्णतः बंद झाले होते. यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. हलाखीच्या दोन वर्षातून आज पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळाल्याने चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
कोरोनात घरातील दागिने विकले :मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे घारापुरी बंदर हे येथील लेण्यांमुळे प्रसिद्ध आहे. तर येथील जनजीवन येथे येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहे. छोट्या दुकानांमधून भेटवस्तू, शोभेच्या वासू, खाद्यपदार्थ, शीतपेय विक्री करून येथील नागरिक आपला उदरनिर्वाह करत असतात. मात्र कोरोना काळामध्ये परतं बंदी असल्याने दोन वर्षे येथील व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला होता. यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आपल्या घरातील दागिने विकण्याची वेळही या नागरिकांना सोसावी लागली आहे.