महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अलिबाग तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक 342 जणांचा कोरोनाने मृत्यू

पनवेल महानगर पालिका क्षेत्रात रुग्ण संख्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने वाढली होती. मात्र आता रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र अलिबाग तालुक्यात रोज शंभरहून अधिक रुग्ण आढळत आहेत. रुग्ण संख्या बरे होण्याचे प्रमाण जास्त असले तरी सर्वाधिक मृत्यू अलिबाग तालुक्यात झाले आहेत. आतापर्यंत 342 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक 342 जणांचा कोरोनाने मृत्यू
जिल्ह्यातील सर्वाधिक 342 जणांचा कोरोनाने मृत्यू

By

Published : May 24, 2021, 12:23 PM IST

Updated : May 24, 2021, 12:42 PM IST

रायगड - जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या हळूहळू आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात रुग्णाची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र अलिबाग तालुक्यात रुग्ण संख्या कमी होत नाही. अलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी कोरोना मृत्यू संख्या वाढत आहे. ही एक चिंतेची बाब आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अलिबाग तालुक्यात सर्वाधिक 342 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने अलिबागमधील वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक 342 जणांचा कोरोनाने मृत्यू
जिल्ह्यात सर्वाधिक अलिबागेत 342 जणांचा झाला कोरोनाने मृत्यूरायगड जिल्ह्यात इतर तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या कमी होत आहे. मात्र अलिबाग तालुका याला अपवाद ठरत आहे. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात रुग्ण संख्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने वाढली होती. मात्र आता रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र अलिबाग तालुक्यात रोज शंभरहून अधिक रुग्ण आढळत आहेत. रुग्ण संख्या बरे होण्याचे प्रमाण जास्त असले तरी सर्वाधिक मृत्यू अलिबाग तालुक्यात झाले आहेत. आतापर्यंत 342 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक 342 जणांचा कोरोनाने मृत्यू
अलिबागेत अद्यापही 1 हजार 482 ऍक्टिव्ह रुग्णअलिबाग तालुक्यात आतापर्यत 12 हजार 487 कोरोना रुग्ण आढळले होते. यापैकी 10 हजार 663 रुग्ण बरे झाले आहेत. तर सद्य स्थितीत 1 हजार 482 रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षीपासून अलिबाग तालुक्यात कोरोना शिरकाव झाल्यापासून अद्यापही कोरोना संकट कमी झालेले नाही. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा तिसऱ्या लाटेत तालुक्याची परिस्थिती अतिगंभीर होण्याची शक्यता आहे.
Last Updated : May 24, 2021, 12:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details