रायगड- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या (बुधवार) 22 मे रोजी चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक चार तासांकरिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ओव्हरहेड गँन्ट्री बसवण्याचे कामकाज करण्यात येणार असल्याचे कारणाने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (MSRDC) तर्फे हे काम करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
रायगड - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या (बुधवार) 22 मे रोजी चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून लहान वाहनांची वाहतूक जुन्या महामार्ग क्र. 4 येथे वळविण्यात आली आहे.
याबाबत महामार्ग पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग उद्या रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (MSRDC) तर्फे करण्यात येणार आहे.
या कालावधीत द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक चार तासांकरिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यादरम्यान सर्व प्रकारची अवजड व माल वाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गवरील किमी 33.500 या ठिकाणी थांबण्यात येणार आहेत. तर हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील पर्यायी मार्ग म्हणून खालापूर टोलनाका येथून प्रवासी वाहने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जूना पुणे-मुंबई महामार्गावर वळवण्यात येणार आहे.
सर्व प्रवाशांना वाहनचालकांनी खालापूर टोलनाका ( सावरली फाटा), चौकफाटा ( कर्जत), दांड फाटा, आजिवली चौक, शेडुग फाटा येथून परत एक्सप्रेस वे रुन मुबईकडे अशा पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पनवेल महामार्ग वाहतूक शाखेचे विभागाचे निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.