महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाडच्या चवदार तळे सत्याग्रह दिनाचा आज ९२ वा वर्धापदनदिन - 92th anniversary

चवदर तळे सत्याग्रह दिनाचा ९२ वा वर्धापनदिन आज महाडमध्ये उत्साहात साजरा होत असुन देशभरातुन हजारो आंबेडकरी अनुयायी महाडमध्ये दाखल झाले आहेत.

चवदार तळ्याला केलेली रोषणाई

By

Published : Mar 20, 2019, 9:29 AM IST

Updated : Mar 20, 2019, 12:30 PM IST

रायगड - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्यातील पाणी प्राशन करून अखिल मानव जातीला पाण्याचा हक्क खुला केला. या ऐतिहासिक घटनेला आज ९२ वर्ष पूर्ण होत आहेत. चवदर तळे सत्याग्रह दिनाचा ९२ वा वर्धापनदिन आज महाडमध्ये उत्साहात साजरा होत असुन देशभरातुन हजारो आंबेडकरी अनुयायी महाडमध्ये दाखल झाले आहेत.

चवदार तळ्याला केलेली रोषणाई

चवदार तळ्याला रोषणाई करण्यात आली आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज चवदार तळे, क्रांतीस्तंभ परिसरात विविध पक्ष, समाजिक संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनपर सभा घेतल्या जाणार असून आंबेडकर अनुयायी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून ९२ वर्षांनंतर पुन्हा एकदा चवदार तळे सत्याग्रहाच्या आठवणी जागृत करतील.

सकाळपासूनच अनुयायी चवदार तळ्याच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनुयायांनी अभिवादन केले. तर महाड नगरपालिका प्रशासनाकडून चवदार तळ्याच्या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांसाठी व्यवस्था केली आहे. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Last Updated : Mar 20, 2019, 12:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details