रायगड - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेणजवळ चारचाकी कार उड्डाणपूलावरून कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून यापैकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. संध्या पाटील, प्रीती कडवे आणि राजेश मोरे अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रायगड : पेणजवळ उड्डाणपुलावरून कार कोसळली, अपघातात तीन जण जखमी - पेण जवळ उड्डाणपूलावरून कार कोसळली
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेणजवळ चारचाकी कार उड्डाणपूलावरून कोसळून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा -
रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयात अँटिबायोटिक इंजेक्शनचा तुटवडा
कल्याणहून (एमएच 05. इए. 5576) या चारचाकी कारने तीन जण प्रवासी श्रीवर्धनकडे निघाले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही कार पेण येथील झी गार्डन याठिकाणी असलेल्या पुलावर आली असता चालकाचे नियंत्रण सुटून पुलावरून खाली कोसळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीांना एम.जी.एम रुग्णालयात उचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुलाला संरक्षक कठडे नसल्याने हा अपघात झाला आहे. त्यामुळे पुलाला संरक्षक कठडे बसविणे गरजेचे आहे. अन्यथा अपघाताची मालिका ही अशीच सुरू राहणार आहे.