रायगड - महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे अनेक जण अडकल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीत 47 कुटुंबं राहत होती. आतापर्यंत या दुर्घटनेत १२ रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना झाल्यानंतर अनेक नागरिक मदतीसाठी धावले. तीन स्थानिक नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून ३५ जणांचा जीव वाचवला आहे.
महाड इमारत दुर्घटना : स्वतः जखमी होऊन 'त्या' तिघांनी वाचवले 35 जणांचे प्राण
काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक असलेल्या मुजाहिद शेख, नाविद जुस्ते व अजहर यांनी आपला जीव धोक्यात घालून पस्तीस जणांचे प्राण वाचवले.
मुजाहिद शेख, नाविद जुस्ते व अजहर यांनी आपला जीव धोक्यात घालून पस्तीस जणांचे प्राण वाचवले. या दुर्घटनेत मुजाहिद शेख यांच्या अंगावर भिंत पडून ते जवळच्या गटारीमध्ये ते अडकून पडले होते. यात ते जखमीही झाले. अजहर हे सुद्धा जखमी झाले असून नाविद जुस्ते या तरुणाला आपले पाय गमवावे लागले आहेत. मात्र, इमारतीचे पिलर निखळण्यास सुरुवात होताच या तिघांनी ओरडून सर्व रहिवाशांना बाहेर निघण्यास सांगितले. इमारतीतील 35 जणांना या तिघांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. मात्र, आपण इतर रहिवाशांचे प्राण वाचवू शकलो नाही यांची खंत असल्याचे मुजाहिद शेख यांनी सांगितले.
दरम्यान, जमीनदोस्त झालेल्या इमारतीच्या बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारूक काझी आणि युनूस शेख अशी त्यांची नावे आहेत. दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यासोबतच पोलिसांनी आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड तसेच अभियंता शशिकांत दिघे यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.