रायगड - जोरदार वादळीवाऱ्यासह बुधवारी कोसळलेल्या पावसामुळे जेएनपीटीच्या तीन क्यूसी क्रेन्स कोसळल्या. यामध्ये सुमारे २०० कोटींचे नुकसान झाले आहे. उरण शहर आणि ग्रामीण भागातील अनेक घरांची पडझड झाली आहे. तर काही घरांची पत्रे उडाली असून घरात पाणी शिरले आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा दमदार पाऊस कोसळतो आहे. बुधवारी वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे जेएनपीटीच्या तीन क्यूसी क्रेन्स अगदी पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत. यामुळे जेएनपीटीचे सुमारे दोनशे कोटींचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसल्याची माहिती जेएनपीटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, यामुळे जेएनपीटीच्या व्यवसायाची नव्याने यंत्रणा उभारण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जेएनपीटीच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची भीती कामगार वर्गातून व्यक्त केली जात आहे.
उरण जेएनपीटीच्या तीन क्युसी क्रेन्स कोसळल्या; २०० कोटींचे नुकसान - रायगड जिल्हा पाऊस अपडेट
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा दमदार पाऊस कोसळतो आहे. बुधवारी वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे जेएनपीटीच्या तीन क्यूसी क्रेन्स अगदी पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत. यामुळे जेएनपीटीचे सुमारे दोनशे कोटींचे नुकसान झाले आहे.
![उरण जेएनपीटीच्या तीन क्युसी क्रेन्स कोसळल्या; २०० कोटींचे नुकसान three jnpt cranes crashes in uran of raigad district](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8314183-267-8314183-1596695620256.jpg)
उरण जेएनपीटीच्या तीन क्युसी क्रेन्स कोसळल्या
उरण शहर आणि ग्रामीण भागातील गावानांही मुसळधार पावसाचा तडाखा बसला. गावांतील अनेक घरांची पडझड झाली आहे. गावातील रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे उरणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.