पनवेल- भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी ७ ते ८ जणांच्या मदतीने मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.
मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करणाऱया ३ आरोपींना अटक
याप्रकरणी राजकीय दबावाखाली तपास सुरू असल्याचा संशय येताच नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केले. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.
याप्रकरणी राजकीय दबावाखाली तपास सुरू असल्याचा संशय येताच नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केले. त्यानंतर तपासाला वेग आला आहे. भाजप नगरसेवक विजय चिपळेकर आणि त्यांच्या साथीदारांनी अलिबाग न्यायालयात पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला. मात्र, अलिबाग न्यायालयाने अर्ज फेटाळला. पुण्याला पळून जाण्याचा तयारीत असणाऱ्या मयूर चिपळेकर, किरण सोलंकर, तेजस म्हात्रे यांना नवी मुंबई युनिट ३ च्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. आता पुढील आरोपींचा शोध सुरू असून त्यांना ही लवकरच अटक केली जाणार आहे.
मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ते जाधव यांनी हे पैसे पकडून दिल्याची माहिती चिपळेकर यांना समजली होती. त्यामुळे त्यांनी २९ एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर कट रचून जाधव यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. याप्रकरणी पोलीस तपास करत असून नगरसेवकावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का, याची चौकशी सुरू आहे.