महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडात पुरातन मूर्तींची विक्री करणाऱ्या तिघांना अटक - प्रदिप झिमसे news

अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत सारळ पूल येथे पुरातन मूर्तींची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

रायगड : पुरातन मूर्तींची विक्री करणाऱ्या तीघांना अटक; सागरी पोलीस दल आणि ठाणे गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

By

Published : Sep 23, 2019, 8:59 PM IST

रायगड - वराह अवतारातील बारामुखी विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती विकण्यास आलेल्या तिघांना मांडवा सागरी पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत अटक केली आहे. या मूर्ती जप्त करून पुरातत्व विभागाकडे तपासणीसाठी पाठवल्या आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच आरोपी विरोधात पुढील कारवाई केली जाणार आहे. मात्र, या प्रकरणामुळे अलिबागमध्ये पुरातन मूर्तींची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा -रेल्वेच्या आरक्षण केंद्रातून 44 लाखांच्या रकमेची चोरी, लोकमान्य टिळक टर्मिनस येथील घटना

गोरख कडवे (रा. मिळकतखार) विनीत म्हात्रे (रा. कोळगाव) रतन तुलसीदास (रा. गोरेगाव लिंकरोड) यांना मांडवा पोलिसांनी अटक केले आहे. त्यांच्याकडून भगवान विष्णूची 8 किलो 700 ग्रॅम वजनाची पुरातन मूर्ती व 6 किलो 827 ग्रामची लक्ष्मीची मूर्ती जप्त केली आहे.

हे ही वाचा -आसारामला उच्च न्यायालयाचा दणका; जन्मठेपला आव्हान देणारी याचिका फेटाळली

अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत सारळ पूल येथे पुरातन मूर्तींची विक्री करण्यासाठी काही लोक येणार असल्याची माहिती मांडवा सागरी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांना मिळाली होती. तर ठाणे गुन्हे शाखा 1 चे पोलीस निरीक्षक संदीप बागुल व त्याचे पथक नौपाडा येथील गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यासाठी अलिबागमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनाही मूर्ती विक्रीची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती.

हे ही वाचा -धुळे: 12 वर्षीय चिमुकलीवर 42 वर्षीय नराधमाचा अत्याचार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बोडणी रेवस रस्त्यावरील गोकुळढाबा सारळ पूल येथे संयुक्तरित्या सापळा रचला. त्यावेळी खबऱ्याने दिलेल्या बातमीतील वर्णनाप्रमाणे सफेद रंगाची इनोव्हा कार (एम एच-06/ ए डब्लू /3637) ही आली असता पोलिसांनी कार अडवली. कारमध्ये तीनजण संशयितरित्या बसले होते. त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता कारच्या डिकीत पिवळ्या रंगाच्या धातूची बारा मुखी भगवान विष्णूची आणि लक्ष्मीची मूर्ती सापडली. या मूर्तीबाबत तिघांना विचारले असता त्यांनी काहीही सांगितले नाही. पोलिसांनी तिघांनीही ताब्यात घेऊन या मूर्ती जप्त केल्या आहेत.

हे ही वाचा -मोबाईलवरून महिलांशी अश्लील संवाद साधणाऱ्या सिक्युरीटीला हरयाणातून अटक

संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत सापडलेल्या मूर्ती ह्या पुरातन असून त्या पुरातत्व विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल आला की पुढील कारवाई केली जाईल. तीन जणांना 41 (1) नुसार नोटीस बजावली आहे. अशी माहिती मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी दिली.

हे ही वाचा -अमरावतीच्या महादेव खोरी परिसरात अनैतिक संबंधातून युवकाची हत्या

सुरेश मेकला, अप्पर पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त दिपक टेवराज गुन्हे, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, सहायक पोलीस आयुक्त (शोध-१) गुन्हे, किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-१, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहा. पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पोलीस हवालदार शिवाजी गायकवाड, आबुतालीय शेख, पोना अजय साबळे, दादा पाटील व माडंवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी धर्मराज सोनके, पोलीस हवालदार विनोद जाधव, प्रदिप झिमसे, पोना सुधीर पाटील यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details