रायगड - वयाच्या साडेतीन वर्षांतच गिर्यारोहण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून, आशिया बुक ऑफ रेकॉर्डीस्ट मध्ये नाव झळकावणारी महाराष्ट्राची लाडकी शिवकन्या शर्विका म्हात्रेने पुन्हा एकदा नवा इतिहास घडवला आहे. तिने सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वाधिक उंच असलेला साल्हेर किल्ला सर करून कोरोना योद्ध्यांना मनवंदना दिली आहे.
साडेतीन वर्षांच्या शर्विकाने दुसर्यांदा रचला इतिहास, साल्हेर किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना दिली मानवंदना - शिवकन्या शर्विका म्हात्रे
वयाच्या साडेतीन वर्षांतच गिर्यारोहण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून, आशिया बुक ऑफ रेकॉर्डीस्ट मध्ये नाव झळकावणारी महाराष्ट्राची लाडकी शिवकन्या शर्विका म्हात्रेने पुन्हा एकदा नवा इतिहास घडवला आहे. तीने सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वाधिक उंच असलेला साल्हेर किल्ला सर करून कोरोना योद्ध्यांना मनवंदना दिलीये.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात महाराष्ट्र-गुजरात सीमेवर हा किल्ला आहे. या किल्ल्याची उंची तब्बल 5 हजार 141 फूट आहे. शर्विकाने हा किल्ला सर करत आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. 10 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता शर्विकाने किल्ला आरोहणाला सुरुवात केली. सुमारे साडेपाच तासाच्या चढाईनंतर शर्विकाने महाराष्ट्राच्या सर्वात उंच किल्ल्यावर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकविला. हा विक्रम शर्विकाच्या पालकांनी देशातील तमाम कोरोना योद्ध्यांना समर्पित केला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व डॉक्टर्स, नर्स, पत्रकार, पोलीस, सफाई कामगार, सामाजिक कार्यकर्ते आपापले योगदान देत आहेत. अनेकांना हे कार्य करताना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिने साल्हेर किल्ल्यावरील श्री परशुराम मंदिर या सर्वाधिक उंच असणाऱ्या ठिकाणावरून फलक झळकावून कोरोना योद्ध्यांना मानवंदना दिली .